मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा कोरोनामुळे मृत्यू

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय 79) यांचे आज पहाटे चार वाजता कोविड न्यूमोनियामुळे निधन झाले.

साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अतिदक्षता विभागात त्या पाच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या,

परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

काळुबाईच्या नावाने चांगभलं’ या मालिकेचं शूटींग साता-यात सुरु आहे. या सेटवरील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता.

आशालता यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे 100 हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे.

Related posts

अलिबाग लघुपट महोत्सव येत्या रविवारी

Vishal Khandagale

न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; कोरोनाचीही झाली होती लागण

Vishal Khandagale

घुसमट,नैराश्य आणि आत्महत्या! – सुहास सोहोनी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX