Pune City News
गुन्हे विषयक

पोलास मुख्यालयातच ‘फ्री स्टाईल’ हाणामारी…..

सायबर पोलिस ठाण्यातील मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. या घटनेची पुणे पोलिस दलात जोरदार चर्चा झाल्याने वरिष्ठ पोलास अधिकार्याकडून संबंधीत प्रकरण गांभीर्याने लक्ष घातले आहे.संबंधीत प्रकरणातील दोन्ही महिला पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. एक महिला पोलिस नाईक, तर दुसरी पोलिस शिपाई आहे. दोघीही नेहमीप्रमाणे मुख्यालयामध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी ड्युटीच्या कारणावरुन दोघींमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघींनी एकमेकींना शिवीगाळ केल्याने त्याचे पर्यवसन भांडणामध्ये झाले. त्यावेळी पोलिस शिपाई कर्मचाऱ्याने पोलिस नाईक महिलेवर हात उचलला. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आरडाओरडा झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली. त्यातूनच ही बातमी पोलिस दलात पोचून त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली.दरम्यान, महिला पोलिस कर्मचाऱ्यांमधील भांडणाचा हा प्रकार मुख्यालयाचे प्रभारी पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांच्यापर्यंत पोचला. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन खात्याअंतर्गत चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच या स्वरुपाचे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे.

Related posts

2 वर्षां पुर्वी चे गोळीबार प्रकरण ; गुन्हेगार सचिन पोटे व सचिन शिंदें विरूध्द FIR

Vishal Khandagale

WhatsApp वर Online हुक्का विक्रीचा पर्दाफाश !

Vishal Khandagale

येरवडा कारागृहात फरशीने हल्ला : एका कैद्याचा मृत्यू, दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

Leave a Comment