महाराष्ट्र

शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील…

SHIVSENA B

PUNE CITY NEWS :- शिवसेना भवनात वावर असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून मुंबईतील शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवले जाणार आहे.

दादर येथील शिवसेना भवन हे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. शिवसेनेशी संलग्न असलेल्या विविध संघटनांची कार्यालयं शिवसेना भवन इमारतीत आहेत. त्यात स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व अन्य संघटनांची कार्यालये आहेत.

या संघटनांशी संबंधित अनेक पदाधिकारी रोज येथे येत असतात. शिवसेना भवनात कायमस्वरूपी कर्मचारी वर्गही आहे. त्याशिवाय, शिवसेनेच्या छोट्या-मोठ्या अनेक दैनंदिन बैठकाही येथेच होतात. .

नियमित शिवसेना भवनात येणारा एक शिवसैनिक पॉझिटिव्ह आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाचे निर्जंतुकीकरण केले जाणार असून येथील दैनंदिन कामकाज काही दिवस बंद राहणार आहे. राज्यातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना पुढील काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

पक्षकार्याबरोबर इतर सामाजिक कामांच्या निमित्ताने शिवसैनिक नेहमी लोकांमध्ये वावरत असतात. त्यातून आतापर्यंत अनेक शिवसैनिकांना व काही नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. आता हा संसर्ग शिवसेना भवनपर्यंत पोहोचल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

Related posts

कायदा अपंग: फाशीमुळे भावना संपुष्टात

Vishal Khandagale

कोरोना: कॉर्पोरेटची स्वयंम-स्फूर्ती ने “वर्क फॉर्म होम”ला साथ

Vishal Khandagale

‘होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी’; देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX