पिपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती

PUNE CITY NEWS :-पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआगोदरच बदली करण्यात आली आहे. आता पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राज्याचे विशेष पोलीस महासंचालक असलेले कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कृष्ण प्रकाश यांना आर्यनमॅन म्हणून ओळखले जाते. संदीप बिष्णोई यांच्या बदली बाबतच्या चर्चा चांगलीच रंगली होती. गृहमंत्रा लयाकडून त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

२० सप्टेंबर २०१९ रोजी बिष्णोई यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही.

तसेच त्यांच्या कार्य पद्धतीबाबत राजकीय नेत्यांमध्येही नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत होते. ती नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेली होती. त्यातु ही बदली झाल्याचे बोलले जात आहे.

Related posts

कोरोना: “राज्यभरात एकूण 1 हजार 330 बेड”

Vishal Khandagale

“जनता कर्फ्यु” मधे वाढ : जमाव बंदी कडक !

Vishal Khandagale

दुहेरी हत्याकांडाने दापोडी हदरले !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX