Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

पिंपरी-चिंचवड शहरात पाच संशयित

पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आता राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन करु नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
कोरोना विषाणचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. वायसीएममध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून तो सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलेशन बेड उपलब्ध केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.

Related posts

आळंदी परिसरातील वडगाव घेनंद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Vishal Khandagale

पीएमपीएल बस सुरु करण्याची मागणी : औद्योगिक विकास मंडळ अध्यक्ष

Vishal Khandagale

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती !

Vishal Khandagale

Leave a Comment