Pune City News
पुणे

उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांचे कचऱ्याविरोधात आंदोलन

PUNE CITY NEWS :- पुणे महानगरपालिकेने कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा डंपिंग करू नये, यासाठी सोमवारपासून उरळी देवाची आणि फुरसुंगी गावातील ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलना दरम्यान आक्रमक पवित्रा घेतल्याने ऐन पावसाळ्यात कचरा प्रश्न पेटला आहे.

उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावच्या हद्दीतील सुमारे १७३ एकर जागेत महापालिकेच्या कचरा डेपो आहे.

ही गावे महापालिकेत आल्यानंतरही कचरा डेपो कायम आहे. या ठिकाणी रोज सुमारे ८०० टन कचरा टाकला जातो. या डेपोमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे.

गावातील पाण्याचे स्त्रोत देखील दुषित झाले आहेत. परिणामी रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार करीत डेपो बंद करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. या मागणीसाठी बे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Related posts

शिवाजी मतदार संघाच्या चिटणीस पदी

Vishal Khandagale

“कोरोना” बाबत अफवा पसरवणारी शिक्षिका निलंबित!!

Vishal Khandagale

“या” रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक*

Vishal Khandagale

Leave a Comment