Pune City News
कोथरूडगुन्हे विषयक

पितापुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल: महिलेच्या पोटावर लाथ मारुन घडवून आणला होता गर्भपात

उसाच्या रसाची गाडी येथे का लावतो, असे म्हणून मारहाण करुन महिलेचा गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

जयेश ऊर्फ जित अनिरुद्ध कुलकर्णी (वय ३६, रा. गणेश कुंज सोसायटी, रामबाग कॉलनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे वडिल अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी, कोथरुडमधील रामबाग कॉलनी मधील गणेश कुंज सोसायटीच्या सार्वजनिक रस्त्यावर एका कुटुंबाने उसाचा लाकडी चरकातून रस काढण्याची गाडी लावली होती. या गाडीमुळे त्रास होतो, असे रहिवाशांचे म्हणणे होते. १७ फेब्रुवारी रोजी जयेश व अनिरुद्ध कुलकर्णी या पिता पुत्रांनी उसाची गाडी का लावतो, असे म्हणून संतोष भोसले यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.

यावेळी त्यांची पत्नी मनिषा या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असताना या दोघांनी त्यांच्या पोटावर लाथ मारली. त्यानंतर भोसले यांनी त्यांच्या पत्नीला ससून  रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा गर्भपात झाल्याचे आढळून आले. महिलेचा गर्भपातासारखा प्रकार घडल्यानंतरही कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार करुन रहिवाशांच्या कृत्याचे समर्थन केले. या दाम्पत्यानेच मारहाण केल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर मेधा कुलकर्णी, अनिता तलाठी व कुलकर्णी पितापुत्र या चौघांनी १९ मार्च रोजी येऊन तक्रार अर्ज मागे घे असे सांगून शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

येथे उसाच्या रसाची गाडी लावायची नाही, अशी धमकी दिल्याची तक्रार केली होती. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास केल्यानंतर शुक्रवारी रात्री कोथरुड पोलिसांनी गर्भपात घडवूनआणणे व मारहाण केल्याबद्दल पितापुत्रांवर गुन्हा दाखल केला.

जयेश कुलकर्णी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहे.

Related posts

तरुणीला पहिल्या मजल्यावरून फेकले

Vishal Khandagale

पूजा चव्हाण- भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले

Vishal Khandagale

भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की चा प्रयत्न !

Vishal Khandagale

Leave a Comment