Pune City News
कसबापुणे शहर

संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ मंदिर बाबत ; ट्रस्टने केली महत्त्वाची घोषणा

पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला (बुधवार, दि. ३१ मार्च) दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे.

केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. तरी गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश नाही :-

दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून बुधवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे.

 

Related posts

पेट्रोल दरवाढीचे शतक ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध

Vishal Khandagale

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस तर्फे “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम सुरु !

Vishal Khandagale

येरवडा कारागृहात फरशीने हल्ला : एका कैद्याचा मृत्यू, दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

Leave a Comment