Pune City News
पिपरी चिंचवडमहाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बस पेटली

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनपुरी घाटाच्या पायथ्याशी आनंदवाडी शिवारात
शिवशाही बस क्रमांक एम एच 14 जी यू 2445 ही नाशिकहून पुण्याकडे येत होती.अचानक आग लागल्याचे समजताच चालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस घेऊन बसमधील 40 प्रवाश्यांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यानची घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी मदत केली. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होवून आग आटोक्यात आणली महामार्ग पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवेली होती.
बसला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. खरेतर शिवशाही बस म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची रुबाबदार ओळख. खासगी कंपन्यांसोबतच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी या बसची निर्मिती करण्यात आली .कधी बसचा अपघात होतो. कधी बस रस्त्यात मध्येच बंद पडते तर, कधी चालती बस अचानक पेट घेते. त्यामुळे सेवेपेक्षा इतरच कारणांमुळे बससेवा चर्चेत असते.

Related posts

सिरमची कोरोना लस सुरक्षित, लस उत्पादनाला फटका नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

पुणे शहरांत ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून होणार वाढ !

Vishal Khandagale

लॉकडाऊन काळात पोलिसांनी लाठीचा वापर करू नका : पोलीस महासंचालक

Vishal Khandagale

Leave a Comment