Pune City News
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरमहाराष्ट्रवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

“पुणे बंद व मूक मोर्चा” वाहतुकीत बदल !

पुणे शहर :- दिनांक १३ / १२ / २०२२ रोजी विविध राजकिय पक्ष व संघटनांकडुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात पुणे बंद व मुक मोर्चा चे आयोजन केले असुन . सदरचा मोर्चा हा सकाळी ०९.०० वा. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथुन टिळक चौकातुन लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाग चौक- डावीकडे उळुन शिवाजीरोड ने उलट मार्गे जिजामाता चौक, लाल महल येथे समाप्त होणार आहे.

या वेळेत डेक्कन, विश्रामबाग व फरासखाना वाहतूक विभागाचे हद्दीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकी बदल करण्यात आला आहे

डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना व समर्थ वाहतुक विभाग पुणे अंतर्गत दि. १३/ १२ / २०२२ रोजी सकाळी ०९.०० वा. पासून / मोर्चा सुरु झालेपासून खालील नमुद रस्ते

वाहतूकीसाठी आवश्यकतेनुसार बंद करण्यात येतील.
• लक्ष्मी रोड :- सोन्या मारुती चौक ते अलका टॉकीज चौक (मोर्चा सुरु झालेपासून बेलबाग चौक पास होईपर्यंत )
• शिवाजी रोड : स. गो. बर्वे चौक ते बेलबाग चौक (मोर्चा सेवासदन चौक पास झालेनंतर मोर्चा संपेपर्यंत)
• बाजीराव रोड :- पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक (मोर्चा सेवासदन चौक पास हाईपर्यंत आवश्यकतेप्रमाणे)
• गणेश रोड :- फडके हौद चौक ते जिजामाता चौक (मोर्चा सेवासदन चौक पास हाईपर्यंत आवश्यकतेप्रमाणे)
• केळकर रोड :- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (मोर्चा बुधवार चौक येथून पास होईपर्यंत) दि. १३/ १२ / २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून मोर्चा संपेपर्यंत बेलबाग चौक ते टिळक चौक कने नो-पार्किंग करण्यात येत आहे.
• नेहरु रोडवरील नरपतगीरी चौकातून १५ ऑगस्ट चौकाकडे पावर हाऊस चौकतून के ई एम हॉस्पीटलकडे व संतकबीर चौकातून लक्ष्मी रोडने पी.एम.पी.एम.एल बसेस बसेसची वाहतूक आवश्यकतेप्रमाणे सेव्हन लव्हज् चौक तसेच मालधक्का चौक मार्गे वळविण्यात येईल.
-: पर्यायी मार्ग :-
मोर्चाचे कालावधीत वर नमुद मार्गावरील वाहतूक परिस्थिती पाहून आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येत असून वाहन चालकांनी टिळक रोड, केळकर रोड व कुमठेकर रोडचा वापर करुन इच्छितस्थळी जावे.

“विजयकुमार मगर पोलीस उप आयुक्त, याकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१ / सीआर ३७ / टीआरए २. दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी विजयकुमार मगर, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर तात्पुरत्या स्वरुपात खालीलप्रमाणे आदेश निर्गमीत करीत आहे.”

Related posts

पुणे न्यायालायचे कामकाज आता 2 शिफ्टमध्ये चालणार

Vishal Khandagale

सिध्दार्थनगर वासियांचा संपणार वनवास,आमदार सुनील आण्णा टिंगरे यांचा पाठपुरावा !

Vishal Khandagale

आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ

Vishal Khandagale