Pune City News
पुणे

पुणे महापालिकेची पावसाळा पूर्व कामकाज नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न.

Pune City News:-  पुणे महापालिकेची पावसाळा पूर्व कामकाज सद्यस्थितीत कोणत्या टप्प्यावर आहे,तसेच विविध विभागातील नियोजनाची पुर्व तयारी याबाबत आढावा बैठक  श्री,छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात (जुने सभागृह ) येथे मा.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.२१ मे रोजी संपन्न झाली.  सदर बैठकीस रुबल अगरवाल(अतिरिक्त मनपा आयुक्त,जनरल ),शान्तनू गोयल (अतिरिक्त मनपा आयुक्त, विशेष,) शहर अभियंता प्रशांत वाघमारे, व सर्व परिमंडळ आयुक्त,उपायुक्त, खातेप्रमुख, मनपा सहाय्यक आयुक्त,व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळा पूर्व कामांच्या पुर्ततेच्या अनुषंगाने विविध खातेनिहाय व क्षेत्रीय कार्यालयांनी पावसाळा पूर्व केलेली कामे,पुढील कालावधीत करावयाची कामे व कामांच्या पुर्ततेकरिता आवश्यक साधनसामुग्री,मनुष्यबळ नियोजन,कोरोना बाधित,संशयित रुग्ण यांच्याकरिता स्वतंत्र नियोजन,व पूरग्रस्तांकरिता स्वतंत्र शाळा व शेल्टर्स नियोजन,चेंबर्स, ओढे,नाले,मल व जलवाहिन्यांची दुरुती,स्वच्छता कामे,रस्ते,कलव्हर्टची कामे,धोकादायक वाडे,मिळकती,गावठाणातील जुने वाडे,घरे,भिंती,त्याचबरोबर शहरातील धोकादायक मिळकती,सीमाभिंती,अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे,यांच्यावरील करण्यात आलेल्या कारवाया,देण्यात आलेल्या नोटिसा,धोकादायक वृक्ष,पंप,पाणी उपसा करण्याकरिता पंपांची उपलब्धता, बोटी,जीवरक्षक,२४×७ व मेट्रो संदर्भातील अडथळा ठरणारी कामे,जेसीबी,पोकलेन,ध्वनिक्षेपन यंत्रणा,कंटेन्मेंट व नॉन कंटेन्मेंट झोन मधील कामे,अनधिकृत जाहिरात फलक,औषधे, कीटकनाशके फवारणी,झाडपडी घटनांचे नियोजन,अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण,अशा विविध कामकाजासंदर्भात आढावा घेण्यात आला.
वरीलप्रमाणे करण्यात येणाऱ्या कामकाजाचे नजीकच्या कालावधीत पुन्हा आढावा बैठक घेण्यात येऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे मा.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Related posts

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक…

Vishal Khandagale

कात्रज परिसरात भीषण वणवा पेटला !

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment