Pune City News
पुणे

प्रशासकीय यंत्रणेत समन्वय साधा : पालकमंत्री अजित पवार

Pune City News:- पुणे शहरातील कोरोना ची परिस्थीती बाबत पालकमंत्री यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार, आमदार व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत केल्या. तसेच परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अधिकाधिक रेल्वेची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना माहिती वेळोवेळी देण्यात यावी. पोलिस प्रशासनानेही समन्वय ठेवावा. पुणे कँटोन्मेंटला आणखी निधी द्यावा, असे ते म्हणाले.

आमदार सिध्दार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सुनील शेळके, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम् व संदिप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा अपर आयुक्त रुबल अग्रवाल व शांतनू गोयल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Related posts

शनिवारवाड्याचा 289 वर्धापन दिन साजरा

Vishal Khandagale

खंडोबा मंदिर खुले करण्यासाठी जेजुरीत मनसेचे आंदोलन

Vishal Khandagale

पुणेकर गिरिप्रेमी जितेंद्र गवारेची एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

Vishal Khandagale

Leave a Comment