Pune City News
कोरोनापुणे शहर

पुणे शहरातील निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणे शहर :- नवीन आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसह सर्व प्रकारच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी दिले आहे.

पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

पुणे महापालिकेचे नवीन आदेश पुढीलप्रमाणे :

  • पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी.
  •  बँकांचे कामकाज सूरु राहणार.
  •  अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार.
  •  रेस्टॉरंट आणि बार हे फक्त पार्सल आणि घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
  •  ई- कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच इतर वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा
  •  शहरात दुपारी ३ नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण ,सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी.
    महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त) २५ टक्के अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
  •  कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्याच्याशी निगडित देखभाल व दुरुस्ती सेवा ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार.
  •  मद्याविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार

राहणार बंद :- 

  • सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल
  • चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग बंद
  •  उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने बंद रहाणार
  •  सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
  • पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
  •  सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने
  • मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार बंद राहणार
  • लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ यावरील निर्बंध कायम

Related posts

कोरोना: देशाच्या जनतेने बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करा: प्रियंका गांधी

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तू २४ तास उघडे : मुख्यमंत्री ठाकरे

Vishal Khandagale

23 गावांच्या समावेशाबाबत हरकती व सूचनांवर सुनावणी 19 व 20 एप्रिलला !

Vishal Khandagale

Leave a Comment