Pune City News
पुणे शहरमहाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले :

▪️ राज्यातील काही भागांत कोरोनाबाधितांची संख्या घटत असून ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

▪️ राज्यात आज कोरोनाची रुग्णसंख्या 18 हजारांवर आली आहे. मात्र, पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती.

▪️ ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे.

▪️ कोरोनाच्या परिस्थितीत आता फरक दिसत आहे. परंतु, कोरोनाची आकडेवारी हवी तशी खाली आलेली नाही.

▪️ रुग्णसंख्या कमी होत चालली असली तरी मागील वेळी सर्वोच्च संख्येच्या जवळ आपण आता आलो आहोत.

▪️ दुसर्‍या लाटेतला विषाणू झपाट्याने पसरतो आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन नाही परंतु निर्बंध कायम राहणार आहेत.

▪️ राज्यात म्युकरमायकोसीसचा धोका वाढतोय. बुरशीच्या नव्या आजारावर टास्कफोर्स काम करत आहे.

▪️ कोरोनाचे नवे स्ट्रेन अधिक घातक आहे, खबरदारी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते.

▪️ किनारपट्टीवर नव्या उपाययोजना करणार असून तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना लवकरच मदत दिली जाणार आहे.

▪️ दरम्यान, काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Related posts

जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान…

Vishal Khandagale

पेट्रोल दरवाढीचे शतक ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध

Vishal Khandagale

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद!

Vishal Khandagale

Leave a Comment