Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात 101 मोफत रुग्णवाहिका उपलब्ध !

पुणे शहरात दिवसाला पाच ते सहा हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याचवेळी गंभीर रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बेड आणि रुग्णवाहिका मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेने आयसोलेशन, कोविड केअर सेंटर, रुग्णालयांमधील रुग्णांसाठी रुग्णवाहिका आणि मृत व्यक्तींच्या मृतदेहासाठी शववाहिका पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेकडे असलेल्या 46 रुग्णवाहिका कमी पडत असल्याने आणखी 55 रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे 101 रुग्णवाहिका शहरातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी 23 वाहने शववाहिका म्हणून तर 78 वाहने रुग्णवाहिका म्हणून काम करणार आहेत. यामध्ये 63 रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असून कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी 11 रुग्णवाहिका निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी 56 रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत राहणार आहे. ही सर्व सुविधा विनामुल्य असून नागरिकांनी रुग्णवाहिका मिळण्यासाठी 9689939381 या किंवा शासनाच्या 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी प्रथम बेड उपलब्धतेबाबत खातरजमा करावी, आणि मगच रुग्णवाहिकेची मागणी करावी. कोरोनाबाधित मृत व्यक्तींसाठी शववाहिका उपलब्ध होण्यासाठी पीएमपीएमएल येथे नियंत्रण कक्ष व नियोजन करण्यात आले आहे.

 

Related posts

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु

Vishal Khandagale

पुणे शहारातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत “कर्फ्यू” कडक

Vishal Khandagale

पितापुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल: महिलेच्या पोटावर लाथ मारुन घडवून आणला होता गर्भपात

Vishal Khandagale

Leave a Comment