Pune City News
CORONA HELPकोरोनापुणे शहर

पुणे शहर भाजपचे ५२५० रक्त पिशव्यांचे संकलन

पुणे शहर :- मागील पंधरा दिवसांत शहराच्या विविध भागांत ६० रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शहर भाजपने ५२५० रक्त पिशव्यांचे संकलन केल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे.

मुळीक म्हणाले, ‘एरव्ही उन्हाळ्यात रक्तदात्यांचा प्रतिसाद अल्प असतो. त्यात कोरोनाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. त्यामुळे शहरातील रूग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. रूग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. त्यासाठी नियोजनपूर्वक शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

मुळीक पुढे म्हणाले, ‘शहर भाजपने गेल्या पंधरा दिवसांत ६० रक्तदान शिबिरांतून ५२५० रक्त पिशव्यांचे संकलन केले. त्यामुळे शहराबरोबरच जिल्ह्यात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुर्तास रक्तदान शिबिरांचे आयोजन थांबविण्यात आले आहे. मागणीनुसार पुन्हा ते सुरू करण्याचे नियोजन तयार आहे.’

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील भाजपचे खासदार, आमदार, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी शिबिरांचे संयोजन केले. ससून हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल या रूग्णालयांचे आणि जनकल्याण रक्तपेढी, पीएसआय ब्लड बँक, पुणे ब्लड बँक, आनंदऋषिजी ब्लड बँक, रक्ताचे नाते, लायन्स क्लब, रेडक्रॉस, आयएसआय ब्लड बँक, ओम ब्लड बँक आदींसह विविध संस्था आणि संघटनांचे सहकार्य लाभले.

विधानसभा मतदारसंघनिहाय रक्तदात्यांची आकडेवारी कंसात दर्शविली आहे.
एकूण शिबिरांची संख्या – ६०
कोथरूड (१४७४) खडकवासला (११९०) शिवाजीनगर (६६१) वडगावशेरी (६१६) पर्वती (४२७) कसबा (४१२) हडपसर (२६५) आणि कॅन्टोन्मेंट (२०५) एकूण (५२५०

Related posts

पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद !

Vishal Khandagale

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने महापालिकेला निर्जंतुकीकरण कक्ष भेट !

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment