Pune City News
कोरोनापुणे

कोरोना: बाधित रुग्णांची पुष्टी होणार कीट ! बनवण्यात पुणेरी डॉ.मीनल दाखवे-भोसले यानां यश

Pune City News:- जगात महामारी म्हणून थैमान घातलेल्या कोरोना विषाणुला रोखण्यासाठी जगात ठिकठिकाणी कोरोना विषाणु बाबत लस, किट, तयार करण्याचे काम चालू आहे. अजपर्यंत कोरोन विषाणु बाबत कोणतीही लस, औषध बनवण्यात यश आले नाही. मात्र कोरोनाची बाधित रुग्णांची लवकर पुष्टी झाली तर कोरोना व्हायरसला आळा घालता येऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील रिसर्च डिपार्टमेंटच्या मराठमोळ्या डॉक्टर मीनल दाखवे-भोसले यांनी एक किट तयार केली आहे. या किटवरून रुग्ण कोरोना बाधित आहे की नाही याची पुष्टी होणार आहे.
विशेष बाब म्हणजे फक्त दोन ते अडीज तासांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची पुष्टी होणार आहे. मायलॅबकडून ही किट बाजारात आणल्या गेली आहे. या किटला पॅथो किट असे नाव देण्यात आले आहे. ह्या किटची निर्मिती करण्यासाठी 6 आठवड्याचा कालावधी लागला आहे. पुण्यातील विषाणूतज्ञ डॉक्टर मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्वाखाली ह्या किटची निर्मीती करण्यात आली आहे

Related posts

दौंड तालुका कोरोनाचा व्हॉटस्पॉट

Vishal Khandagale

पुणे शहरातील शिवभोजन केंद्रामध्ये गरजूंना लाभ !

Vishal Khandagale

कोरोना: ‘एमपीएससीची पूर्वपरीक्षा वेळापत्रकानुसारच’

Vishal Khandagale

Leave a Comment