Pune City News
गुन्हे विषयकपुणे

पोलीस नाईक संजय बनसोडे यांची आत्महत्या !

PUNE CITY NEWS :-  पुणे पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय बनसोडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. संजय बनसोडे हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांना दारूचे व्यसनही होते.

काही दिवस ते कामावरही उपस्थित नव्हते. गेल्या पंधरा दिवसापूर्वीच कामावर हजर झाले होते. पुण्यातील सोमवार पेठ परिसरात ते रहायला होते.

मात्र, शनिवारी (१३) रोजी ते कामावरून घरी गेले, मात्र आज सकाळी ते कामावर हजर झाले नाहीत. अधिक माहिती घेतली असता, त्यांनी घरातच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Related posts

रस्ता सुरक्षेच्या प्रसाराकरीता १५ सप्टेंबर रोजी वेबीनारद्वारे चर्चासत्राचे आयोजन

Vishal Khandagale

9 हजार कोटी द्या; मग गावे समाविष्ट करा : महापौर

Vishal Khandagale

अखिल भारतीय अग्रवाल परिषदेच्या अग्रोदय महाअधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची उपस्थिती

Vishal Khandagale

Leave a Comment