गुन्हे विषयक

बहिणीपासून लांब रहा, असे म्हणत मुलीच्या भावाचा तरुणावर हल्ला

धानोरी परिसरात प्रेम संबंधातून मुलावर मुलीच्या भावांनी आणि वडिलांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी ( दि.14) रोजी मध्यरात्री घडला.

राजू गौतम भिसे (वय 25 ) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. राजू भिसे यांची आई सुनीता भिसे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. आशिष मोरे, जीवन परियार, प्रतीक ओव्हाळ आणि सुनील ओव्हाळ या चार आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजू याचे प्रतिक याच्या बहिणी सोबत प्रेमसंबंध आहेत. या कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रतिकने माझ्या बहिणीचा नाद सोडून दे, असे सांगत प्रतीक आणि त्याच्या वडिलांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजू भिसे याला लोखंडी रॉडने मारहाण केली.

तसेच त्याच्या डोक्यात कोयत्याने वार देखील केले. यामध्ये राजू भिसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याशिवाय राजू भिसे यांच्या आईला मारहाण केली आहे.

विश्रांतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

Related posts

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

Vishal Khandagale

हरणाच्या शिंगाची तस्करी; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

Vishal Khandagale

येरवडा पोलीस ठाणे व पेपल सेमनरी कडून गरजू व गरीब नागरिकांना किराणा वाटप!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX