पुणे

बारामती पोलिसांची धडक कारवाई, ४७ लाखांचा गांजा जप्त

पाटस-बारामती रस्त्यावर बारामती तालुका पोलिसांनी सुमारे ४७ लाख रुपयांच्या गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बारामती तालुका पोलिसांनी ४७ लाख रुपयांचा पकडलेला गांजा ही अलिकडील काळातील बारामतीतील सर्वात मोठी कारवाई आहे.

विजय जालिंदर कणसे  (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) विशाल मनोहर राठोड  (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली),निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी अटक केल्याची नावे आहेत.

सोमवारी (दि. २०) रात्री पाटस- बारामती रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत हवालदार भानुदास बंडगर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार इसम हे त्यांच्याकडील अशोक लेलंड कंपनीच्या (एमएच-१०, सीआर-४३२६) मधून गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती.

उंडवडी गावच्या हद्दील ड्रायव्हर ढाब्याजवळ काही अंतरावर सापळा रचला काही वेळानंतर मिळालेल्या माहिती प्रमाणे तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता टेम्पोत गांजाची ११ पोती आढळून आली.

पोलिसानी केलेल्या कारवाईत टेम्पोमध्ये १३६ बंडल ताब्यात घेतले त्याचे वजन ३१२.८७४ किलोग्रॅम आहे. पोलिसांनी टेम्पोही सह ५७ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

Related posts

राज्यपालांचे आज शहरात आगमन

Vishal Khandagale

राज्यात काय चालू राहणार काय नाही पहा

Vishal Khandagale

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX