Pune City News
पुणे

येरवडा कारागृहातून दोन कोरोना बाधित कैद्यांचे पलायन

YERWADA JAIL

येरवडा येथे तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेल्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या कैद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

अनिल विठ्ठल वेताळ (वय २१, रा. भीमा कोरेगाव, ता शिरूर, जि. पुणे) आणि विशाल रामधन खरात (घर नं ५, फातिमा मशिदीसमोर श्री समर्थ हौसिंग सोसायटी, निगडी, पुणे) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे. यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गेली आहेत.

अनिल वेताळ आणि विशाल खरात यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते कुणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात हे कैदी पळून गेल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Related posts

…तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

Vishal Khandagale

अंगारक चतुर्थी

Vishal Khandagale

पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

Vishal Khandagale

Leave a Comment