Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

मध्यप्रदेशात राजकीय चिखल “ऑपरेशन लोटस”

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील 20 मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा सादर केला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर कमलनाथ आपला दिल्ली दौरा अर्ध्यावर सोडून भोपाळला रवाना झाले होते. रात्री दहाच्या सुमारास कमलनाथ यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. त्यावेळी 20 मंत्र्यांनी आपले राजीनामे कमलनाथांकडे सोपवले.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.ज्योतिरादित्य सिंधिया खरेच भारतीय जनता पक्षात गेले तर भारतीय जनता पक्ष कदाचित सिधिया यांना राज्यसभेवर पाठवू शकतो असे म्हटले जाऊ लागले आहे.

आज मध्य प्रदेशातील विरोधी पक्ष भाजपनं आपल्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावलीय. सायंकाळी 6.00 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपनं आपल्या सर्व अर्थात 107 आमदारांना निरोप धाडलाय.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. यांपैकी 2 आमदारांचे निधन झाले आहे. अशा प्रकारे विधानसभेची सध्याची सदस्यसंख्या आहे 228 इतकी. काँग्रेसकडे एकूण 114 आमदार आहेत. तर सरकार बनवण्याचा जादुई आकडा 115 इतकी आहे. काँग्रेसला 4 अपक्ष, 2 बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदाराचे संमर्थन आहे. अशा प्रकारे काँग्रेसकडे एकूण 121 इतके बळ आहे. तर, भारतीय जनता पक्षाकडे 107 आमदार आहेत.

Related posts

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना दिलासा !

Vishal Khandagale

अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

Vishal Khandagale

Leave a Comment