Pune City News :-दिल्लीतल्या तबलिगी जमातीने कार्यक्रमाची माहिती लपवल्याचा आरोप होत असताना या प्रकरणी आज गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे आठ प्रश्न विचारले आहेत.
▪️ ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोनाचा संसर्ग फैलावला त्याला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का ?
▪️ निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच पोलीस स्टेशन असूनही हे आयोजन थांबवले का नाही ? त्यासाठी गृह मंत्रालय जबाबदारी नाही का ?
▪️ राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवण्यात आले होते ? हे काम डोवल यांचे आहे की दिल्ली पोलीस आयुक्तांचे ?
▪️ अजित डोवल हे तबलिगचे मौलाना साहब रात्री दोन वाजता मरकजमध्ये काय गुप्त यंत्रणा करत होते ?
▪️ अजित डोवल आणि दिल्ली पोलीस आयुक्त या दोघांनीही या विषयावर बोलणे का टाळले ?
▪️ कोणाशी याचे संबंध आहेत ? मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची असून कार्यक्रम तुम्ही का रोखला नाहीत ?
▪️ केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दीन, दिल्लीमधील तबलिगी मरकजच्या इज्तेमाचं आयोजन करण्यासाठी परवानगी का दिली.दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

