Pune City News
पुणे

महापौरांनी केले “फिरते विसर्जन हौद” चे उदघाटन……..

Pune City News:- पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौद सेवेत आज दाखल करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतीचे मांडवातच विसर्जन करावे,या अहवान ला पुणेकरांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्या नागरिकांना घरच्या गणपतीचे घरी विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी आपल्या पुणे महापालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देताना फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज हे फिरते हौद सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडे रवाना करण्यात आले

एका क्षेत्रिय कार्यालयात दोन याप्रमाणे ३० पर्यावरण पूरक गणेश विसर्जन फिरत्या हौद उपक्रमाचा आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत फिरत्या हौदाचा मार्ग, वेळेचे योग्य असे नियोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी उपमहापौर सौ सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने,आयुक्त विक्रम कुमार,उपायुक्त
ज्ञानेश्वर मोळक, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Vishal Khandagale

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत : जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

राज्य शासनाने महापालिकेला आर्थिक मदत करावी -महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

Leave a Comment