Pune City News
महाराष्ट्र

पुणे- नाशिक महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; दहाजण जखमी

पुणे – नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील कळंब गावाजवळ रविवारी( दि.२३) रोजी रात्रीच्या सुमारास शिवशाही बसचा अपघात झाला.

शिवशाही बस (एम.एच.०६ बी.डब्लू. ०६४१) नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने जात होती.

रात्रीच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या नादात ही बस रस्त्यावरच पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये असणारे प्रवासी जखमी झाले आहेत.

या बसमध्ये १० प्रवासी प्रवास करत होते. बस पलटी झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे पहायला मिळाले.

या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. जखमींना मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related posts

सरकारच्या उपाययोजनांची घोषणा कागदावरच…

Vishal Khandagale

आज दहावीचा निकाल होणार जाहीर

Vishal Khandagale

मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा

Leave a Comment