Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील वृत्तपत्रे १ एप्रिल पासून प्रसिध्द !

Pune City News :- कोरोना विषाणू च्या सुरक्षिततेविषयी संपुर्ण देशात केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिल पर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊन पार्श्वभूमीवर आज 25 मार्च रोजी राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत विक्रेते प्रतिनिधी व वृत्तपत्र प्रकाशकांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. केंद्र व राज्य सरकारने सुरू ठेवावयाच्या सेवा वर्गात प्रसार माध्यमाचा समावेश केल्यामुळे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे १ एप्रिल 2020 पासून प्रसिध्द व वितरीत करण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकीतील ठराव …
● वृत्तपत्रांचे १ एप्रिल २०२० पासून प्रकाशन व वितरण पुन्हा सुरू करण्यात येईल,
● प्रतींची मागणी विक्रेते आधीच्या दिवशी नोंदवतील, शिल्लक प्रती कंपनी कोणतीही सबब न सांगता परत घेतील,
● १४ एप्रिल पर्यंत बिल भरण्यास सवलत देणेबाबत कंपन्या सहानुभूतीने विचार करतील,
● डेपोवर गर्दी केली जाणार नाही अंक वेळेवर पोहोचविले जातील . ( पहाटे ३ ते ७ ) ,
● वृत्तपत्रे निर्जंतुक केली जातील.
● विक्रेत्यांना हँड सॅनिटायझर्स , मास्क कंपन्या पुरवतील, विक्रेते व वितरण सहाय्यकांच्या रूग्णालय खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल . ( फक्त कोरोना ) ,
● सोसायट्या / संस्था / वाचकांना वृत्तपत्रे स्वीकारण्याची विनंती कंपन्या करतील,
विक्रेते व वितरण सहाय्यकांना कंपन्या ओळखपत्रे उपलब्ध करून येतील.(नावे विक्रेते देतील)हे इति. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

Related posts

मागील पाच वर्षे सत्तेत असलेल्यांचा नामांताराचा ढोंगीपणा- बाळासाहेब थोरात

Vishal Khandagale

मोरगावच्या मोरेश्वर गणपती मंदिरात पहिल्यांदाच शुकशुकाट….

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अज्ञात शाखेचा एतिहासिक कागदपत्रांमधून उलगडा

Vishal Khandagale

Leave a Comment