Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कोरोना संकटावर मात करून विजयाची गुढी उभारू !

Pune City News :- राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याच अनुषंगाने आलेल्या संकटावर आपल्याला मात करून विजयाची गुढी उभारायची असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले :
▪ कोरोनावर मात करून गुढीपाडवा सण साजरा करा, गुडीपाडव्याच्या शुभेच्छा.
▪ घराबाहेर पडू नका हे जागतिक युद्ध असून जीवनावश्यक वस्तूंसाठी घरातील एकानेच बाहेर पडा.
▪ ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे वेतन कापू नका, हातावरचे पोट असलेल्यांची जबाबदारी आमची.
▪ घरातील एसी बंद करून खिडक्या उघड्या ठेवा, तसेच जीवनावश्यक सेवा सुरु असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आत्तापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्थांचा आकडा 107 वर पोहोचला असून काही रुग्ण बरे होताना दिसून येत आहेत.

Related posts

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी 

Vishal Khandagale

या मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा !

Vishal Khandagale

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

Leave a Comment