Pune City News
पुणे

रस्ता पेठ- मद्रासी गणपतीजवळ इमारतीला आग

आज पहाटे ३  वाजता  रास्ता पेठ, येथील मद्रासी गणपती जवळील इमारतीमध्ये आग लागण्याची घटना घडली. यात ३ फ्लॅट्स व २  दुकाने जळाली. आगीत १  चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर ती काही वेळातच पसरली. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली.

अग्निशमन दलाच्या ६  गाड्यांच्या साह्याने ही आग पुर्णपणे विझवली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, फ्लॅट्स आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.

Related posts

“मला राज्यसभेची अपेक्षाच नव्हती” एकनाथ खडसे

Vishal Khandagale

“महा ई सेवा” चालकांचे सोमवारपासून आंदोलन !

Vishal Khandagale

पुण्याला केंद्राकडून मिळणार १०० व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय स्टाफ

Vishal Khandagale

Leave a Comment