PUNE CITY NEWS:- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील 144 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत राज्यातील 2325 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 26 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत.

