Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संवाद साधला


मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.


महाराष्ट्रातील ११ कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात लक्षणे, त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे.

राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत.

परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे.

परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे.

जी मुख्य शहरे आहेत तेथील टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी.

कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये, अधिकची खबरदारी घ्यावी.

चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता यावेळी उपस्थित होते.

Related posts

कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग: ८०० पेक्षा अधिक दुकाने जळून खाक

Vishal Khandagale

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ!

Vishal Khandagale

संचारबंदी चे आदेश: पुणे पोलीस

Vishal Khandagale

Leave a Comment