कोरोनामहाराष्ट्र

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम !

Pune City News:- राज्यात चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज 17 मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती.

आज अखेर मात्र राज्य सरकारने घोषणा केली असून 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवले आहे. राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत सर्वांचे लॉकडाउन वाढवण्यावर एकमत झाले होते.

लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत असताना सरकारने इतर गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु केली जाणार आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार : “केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे अशी अपेक्षा असणार आहे”.
Letsup

Related posts

कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 107 वर

Vishal Khandagale

दुबई पर्यटन करून आलेल्या दोन पुणेकरांना कोरोना ची लक्षणे

Vishal Khandagale

राज्यात दिवसभरात १२०० रुग्ण घरी जाण्याचा उच्चांक:आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX