Pune City News
पुणे

शहरात एएफएमसीला पाचारण करा; आबा बागुल

aba bagul

शहरामध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वयवर्षे ५५ पुढील डॉक्टरांना आपण निर्देश देऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे अनुभवी व तज्ञ डॉक्टर अश्या अवघड परिस्थितीत हतबल होऊन घरीच बसले आहेत. सद्यस्थितीत शहरामध्ये नवखे डॉक्टर असल्यामुळे त्यांना आयसीयू , सीसीयूमधील रुग्ण हाताळण्याचा अनुभव कमी असून ते घाबरत घाबरत रुग्णांवर उपचार करतात.

कोरोनामुळे डॉक्टरांचा रुग्णांशी थेट संपर्क येत नाही. कोणतीही डॉक्टरांची टीम रुग्णांना हात लावून तपासात नाही. त्यामुळे पुणे शहरात मृत्यू दर  वाढताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसात शहरात कोरोनाचा फैलाव झपाटयाने होताना दिसत आहे. देशाची तुलना केली तर पुणे हे कोरोनाचे नंबर एकचे हॉटस्पॉट बनले आहे. पुणे शहरात कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर एएफएमसीची मदत घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

पुणे शहराकडे स्वतः लक्ष घालून तातडीने  एएफएमसीची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली.

५५ पुढील अनुभवी डॉक्टर सध्या हतबल होऊन घरी असल्याने त्यांची मदत घेऊन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे दररोज रुग्णांच्या परिस्थितीचा अहवाल घेऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करून कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवतील.

या रुग्णांचे काउंसिलिंग करण्यासाठी देखील या डॉक्टरांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल. यासाठी डॉक्टरांची काउंसिलिंग टीम करणे देखील आता गरजेचे झाले आहे. असेही बागुल यांनी सांगितले आहे.

Related posts

कोरोना ग्रस्थ ! मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत!

Vishal Khandagale

कोरोना : ‘1ली ते 8वी’ पर्यंतच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Vishal Khandagale

Leave a Comment