पुणे

शहर गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी श्रीनिवास घाडगे

राज्यातील  ७  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पदी श्रीनिवास घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांची बदली करण्यात आली असून, ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज गृहविभागाने काढले आहेत. यात दोन उपायुक्त आणि ३  सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

https://www.facebook.com/100328258255873/posts/244284490526915/

संग्रामसिग निशानदार (पोलीस उपायुक्त नाशिक शहर ते पोलीस उपायुक्त मुंबई शहर), समाधान पवार (पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई ते पोलीस अधीक्षक अन्न व औषध प्रशासन, मुंबई), श्रीनिवास घाडगे (नियुक्तीच्या प्रतीक्षेत ते पोलीस उपायुक्त पुणे शहर गुन्हे शाखा), प्रेरणा कट्टे (सहाय्यक आयुक्त पिंपरी चिंचवड ते सहायक आयुक्त पुणे शहर), विवेक जोशी (सहाय्यक आयुक्त मीरा भाईंदर ते अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई), सुजाता शेजाळे ( पोलीस उपअधिक्षक जात प्रमाणपत्र पडताळणी मुंबई ते सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई) श्रीहरी पाटील (पोलीस उपअधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे ते पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड)

Related posts

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ससून रुग्णालयाला भेट

Vishal Khandagale

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली सिरम इन्स्ट्यिट्यूटला भेट

Vishal Khandagale

पर्वतीदर्शन परिसर 1 व 2 “Micro Containment Zone” पहा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX