Pune City News
पुणे

राज्य सरकारची कृषी विधेयकाला स्थगिती ; पुणे जिल्हा भाजपतर्फे निदर्शने

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना मर्जीनुसार माल विकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली आहेत. या विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला स्थगिती दिली आहे.याचा विरोध करण्यासाठी आज(बुधवारी) पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिलेल्या निर्णयाची प्रत जाळून तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी या आंदोलनाला माजी मंत्री बाळा भेगडे ,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर कामठे, धर्मेंद्र खांडरे, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी दिशा आणि दशा या दोन्हीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.परंतु २०१९ मध्ये काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी खुली बाजारपेठ करण्याचा आश्वासन दिल होत पण या विधेयकाचा श्रेय नरेंद्र मोदींना जाईल म्हणून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष या विधेयकाला विरोध करत आहे. येत्या पंधरा दिवसात जर महाविकास आघाडी सरकारने या विधेयकाला जी स्थिगिती दिली आहे ती उठवली नाही तर भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील चौकाचौकात रास्तारोको आंदोलन करेल, असा इशारा माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी यावेळी दिला.

Related posts

कोरोना; पुणे शहरात तिघा जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

तरडेंवर गुन्हा दाखल करा विविध संघटनांची मागणी;

Vishal Khandagale

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींना उत्साहात निरोप

Vishal Khandagale

Leave a Comment