Pune City News
राष्ट्रीय

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक!

अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश झाला.

‘गोल्डन ऍरो’ म्हणून ओळखल्या जाणा-या राफेलच्या पहिल्या स्क्वॉड्रनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश केला आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.

शिवांगी सिंह २०१७ साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुस-या बॅचमधील फायटर पायलट आहेत. वाराणसी येथील शिवांगी सिंह यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन ऍरो’च्या १७ व्या स्क्वॉड्रनच्या भाग होतील. २०१७ मध्ये हवाई दलात रुजू झाल्यापासून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह या मिग-२१ बायसन विमानाच्या वैमानिक आहेत.

भारतीय हवाई दलातील १० महिला वैमानिकांनी सुखोई, मिग २९ यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.

Related posts

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

Vishal Khandagale

देशात चोवीस तासांत कोरोनाचा हाहाकार !

Vishal Khandagale

3 विमानतळांच्या खाजगीकरणाला केंद्राची मंजूरी

Vishal Khandagale

Leave a Comment