Pune City News
गुन्हे विषयक

सांगवीतील “सैराट”प्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

तू खालच्या जातीचा आहेस, तुझी लायकी आहे का? आमच्या नातेवाईक मुलीवर प्रेम करायची म्हणत तरुणीच्या नातेवाईकांनी त्या तरुणाला संपवले. पिंपळे सौदागर येथील घटने प्रकरणी आता सांगवी पोलीस ठाण्यात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.

विराज विलास जगताप (वय १८) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांना अटक करण्यात आली असून आणखी दोघे जण ताब्यात आले आहेत.

याप्रकरणी विराजचे चुलते जितेश वसंत जगताप (रा. जगतापनगर, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. मृत विराज याचे आरोपींच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपआपसात संगनमत करून रविवारी (दि.१०) रात्री दहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ विराज हा दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली.

तो खाली पडल्यानंतर त्याला मारण्यासाठी आरोपी टेम्पोतून खाली उतरले. यामुळे घाबरलेला विराज पळून जाऊ लागला असता हेमंत काटे याने लोखंडी रॉड विराजच्या डोक्‍यात मारला. तर सागर काटे याने पाठीत दगड मारला. कैलास काटे, जगदीश काटे व अन्य दोघांनी विराजचे हातपाय पकडले. जातीवाचक बोलत तो विराजच्या अंगावर थुंकला. या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं विराजला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान सोमवारी (दि.८) रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला होता.

Related posts

पोलिसांसाठी ‘मोबाइल क्लिनिक !

Vishal Khandagale

WhatsApp वर Online हुक्का विक्रीचा पर्दाफाश !

Vishal Khandagale

पेट्रोल पंपावर दारोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

Vishal Khandagale

Leave a Comment