Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

“या” रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक*

चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्णालयांना निर्धन रूग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०टक्के खाटा राखीव ठेवून ५० टक्के दराने उपचार करणे बंधनकारक असल्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने  कोव्हिड १९ या आजारासाठी जागतिक महामारी घोषित केली आहे. महाराष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसूनयेत आहे. त्‍यामुळे मोठया प्रमाणात कोव्हिड १९ रूग्णांच्या उपचारासाठीरूग्णालयाची गरज भासत आहे. बीएचएनएअंतर्गत नोंदणीकृत खासगी रूग्णालये यावर उपचार करत आहेत. काही रूग्णालये  जीपसा-पीपीएन  विमा संरक्षणात विविध उपचार पॅकेजनुसार दर आकारणी करतात तर काही रूग्णालये टीपीएद्वारे विशिष्ट करार करून त्‍यांच्याशी झालेल्‍या दर करारानुसार रूग्ण उपचाराची दर आकारणी करतात.

तथापि, विमा संरक्षण न घेतलेल्‍या किंवा विमा संरक्षण मर्यादा संपलेल्या व्यक्तींना काही रूग्णालयांकडून मोठया प्रमाणात दर आकारणी करण्याचे प्रसंग येतात. त्यामुळे शासनाने या अधिनियमाद्वारे खालील बाबी स्पष्ट केलेल्या असल्याचे डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितले आहे

Related posts

दुसऱ्या मजल्यावरून गतीमंद मुलीला खाली फेकलं !

Vishal Khandagale

शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

बकरी ईद साजरी करण्याबाबत निर्देश जारी

Vishal Khandagale

Leave a Comment