पुणे

सिंहगड रोड परिसरात दुर्दैवी घटना

पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच चिमुरडी गॅलरी मधून पडली. चिमुरडीचा पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी घरात कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच गॅलरीतून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अद्विका धरतेज गाथाडे (वय १) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. गाथाडे कुटुंबातील लाडक्या कन्येच्या पहिल्याच वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्विका गॅलरीमध्ये खेळत असताना ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नर्हे येथील राजवीर हाईट्स या सोसायटीमध्ये धरतेज गाथाडे हे राहतात. त्यांच्या मुलीचा अद्विका हीचा बुधवारी पहिलाच वाढदिवस होता. यावेळी घरामध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास वाढदिवसाची तयारी सुरू होती. यावेळी अद्विका गॅलरीमध्ये खेळत होती. तर तिचे बाबा बाथरूमला गेले होते, आणि आई सोसायटीतील लोकांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेली होती. याचवेळी अद्विका गॅलरीमधून खाली पडली.

ही घटना शेजारी राहणार्‍या मंडळीनी पाहताच अद्विकाच्या कुटुंबियांना सांगितले. यानंतर तिला तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related posts

अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीना क्युआर कोड ची सक्ती करु नका ! : पुणे शहर उपआयुक्त मा.संभाजी कदम यांचे आदेश

Vishal Khandagale

कोरोना: 27 लाखांचा सॅनिटायझर्स जप्त !

Vishal Khandagale

लोहेगाव आणि विमाननगर स्वतंत्र महसुली गावे होण्याचा मार्ग मोकळा; भूमी अभिलेख विभागाचा मंजुरी आदेश

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.