पुणे

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू

सिरम इन्स्टिट्यूट मध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

त्यांना हडपसर येथील एका खाजगी रुग्णलायत दाखल करण्यात होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

आज दि. 21 रोजी दुपारच्या सुमारास सिरमच्या एका प्लाटला भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

अग्नीशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जवळपास १०० जवान घटनास्थळी दाखल झाले होते. सिरमच्या नवीन इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आग लागली होती.

तेथून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग विझवण्यात यश आले आहे. ५ व्या मजल्यावर असलेल्या ५ जणांचा आगीत मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये ४ पुरूष आणि १  महिलेचा समावेश असल्याची माहिती आता मिळत आहे.

घटना स्थळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक आमदार चेतन तुपे सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून होते .

Related posts

खंडोबा मंदिर खुले करण्यासाठी जेजुरीत मनसेचे आंदोलन

Vishal Khandagale

“जनता कर्फ्यु” मधे वाढ : जमाव बंदी कडक !

Vishal Khandagale

सकाळी आठ ते रात्री 10 वाजेपर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार राहणार सुरू,नवे नियम…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX