पुणे

पालखी मार्गावरील विठ्ठलाची मूर्ती नागरिकांचे आकर्षण

PUNE CITY NEWS :- पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातील दिवे घाट तसा जगात प्रसिद्ध आहे. कारण पालखी मार्गातील महत्वाचा मार्ग म्हणून तो ओळखला जातो. दिवे घाट संपल्यावर विठ्ठलाचे दर्शन आता होणार हे आता निश्चित आहे. कारण सासवडच्या दिशेने मार्गस्थ होताना घाटाच्या संपल्यानंतर डाव्या बाजूला तब्बल 60 फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी पालखी सोहळा नसल्याने ही तयार करण्यात आलेली आकर्षक मूर्ती नागरिकांचे आकर्षण बनत आहे. पालखी मार्गामध्ये पुणे ते सासवड हा मार्ग अतिशय महत्वाचा मानला जातो.

त्यात ही मूर्ती हडपसर येथील रहिवासी विजय कोल्हापुरे यांनी त्यांच्या हॉटेल परिसरातील जागेवर ही मूर्ती उभारलेली आहे. जी आता लोकांचे आकर्षणाचे केंद्र बनत आहे. मूर्तिकार सागर भावसार यांनी ही मूर्ती घडवली आहे.

Related posts

पिंपरीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा खून; सहा अल्पवयीन आरोपींना अटक

Vishal Khandagale

विभागीय आयुक्तांचे आश्वासन; खासदारांचे आंदोलन मागे

Vishal Khandagale

अभिनेते जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX