सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी नुकतीच कोविशिल्ड या लसीची निर्मिती केली, ही अभिनंदनीय बाब आहे. या कोवोशिल्डची किंमत केंद्र सरकारला 150 रुपये राज्य सरकारांना 400 रुपये व खाजगी हॉस्पिटलसाठी 600 रुपये आदर पूनावाला यांनी नुकताच जाहीर केला आहे.
त्याबाबत भीम आर्मी एकता मिशन महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.
भीम आर्मी बहुजन एकता मिशन यांच्या कार्यकर्त्यांनी गेटवर निषेध आंदोलन केले. त्याचे नेतृत्व भीम आर्मी मिशनचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केले. यावेळी यावेळी नीता अडसूळ, अक्षदा परदेशी व प्रदीप कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

