Pune City News
CORONA HELPआरोग्यकोरोनामहाराष्ट्र

सुजय विखेंनी विमानाने आणलेले रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश

अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरुन चार्टर्ड विमानाने तब्बल 10000 रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा अहमदनगरच्या नागरिकांसाठी आणला होता. परंतु आता सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. कारण या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हस्तक्षेप केला आहे.

खासदार सुजय विखे यांनी 10000 रेमडेसिविर इंजेक्शन विमानाने घेऊन येत गरजूंना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी करून माझ्या मैत्री संबंधाचा वापर करत मी इंजेक्शनचा साठा आणत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. त्यासाठी माझ्यावर कारवाई होईल की, नाही हे मला माहीत नाही. तसेच खाजगी विमानाने हे इंजेक्शन आणतो असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलं होतं.

या सर्व प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुजय विखे यांनी आणलेले सर्व रेमडेसिविर ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सुजय विखे यांनी आणलेल्या दहा हजार इंजेक्शनचा साठा ताब्यात घ्यावा, असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने काढला आहे.

अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांना दिल्लीवरून चार्टर्ड प्लेनने इंजेक्शन आणणे महागात पडू शकतं. कारण आता न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत 10000 इंजेक्शन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ते गरजूंना लवकरात लवकर वाटप करावे असे आदेश दिले आहेत.

Related posts

भारतात एका दिवसात 55 जणांना कोरोनाची लागण !

Vishal Khandagale

राज्यातील 50 टक्के कैद्यांना कारागृहातून सोडणार !

Vishal Khandagale

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Vishal Khandagale

Leave a Comment