Pune City News
गुन्हे विषयक

हडपसर पोलिसांकडून १८ गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त

पुणे शहरात पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सहा जणांकडून तब्बल १८ गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

एवढा मोठा साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ असावी असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अरबाज रशिद खान (वय २१, रा. शिरुर), सूरज रमेश चिंचणे (वय २२, रा. फुरसुंगी, हडपसर), कुणाल नामदेव शेजवळ ( वय १९, रा. शिरुर), जयेश राजू गायकवाड (वय २३, रा. शिरुर), विकास भगत तौर उर्फ महाराज (वय २८, लक्ष्मीनगर, येरवडा), शरद बन्सी मल्लाव (वय २१, रा. शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

परिमंडळ-5 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

हडपसरमध्ये काही तरुण बेकायदा पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली. गुन्ह्यातील पिस्तूल मध्यप्रदेश येथून विकत आणल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts

पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यू !

Vishal Khandagale

शहर सायबर पोलिसांनी सावधगिरीचा दिला इशारा

Vishal Khandagale

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

Leave a Comment