राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. नुकतंच पिंपरी चिंचवड क्षेत्रात आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 17 वर पोहोचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “18 नवे संशयित लोक आले आहेत. तर 24 तासात 32 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. 1 नवा पॉझिटिव्ह पिंपरी चिंचवड क्षेत्रात आढळून आला. हा रुग्ण 14 मार्चला अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईतून पुण्यात आला.
त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्वांची तपासणी सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे.”
previous post
next post

