पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

पुण्यातील हॉटेल्स तीन दिवस बंद!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद राहणार आहेत. पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
पुढील तीन दिवस म्हणजेच 17 मार्च ते 19 मार्चपर्यंत सर्व हॉटेल्स आणि बार बंद ठेवावे, असं आवाहन पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी केले आहे.
पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत. दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे .
याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या व्यापारी असोसिएशनने किराणा, दुध आणि इतर जीवनाश्मक वस्तूंचे दुकाण वगळता सर्व दुकाण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.त्यापाठोपाठ आज पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने तसाच निर्णय घेतला आहे. याशिवाय पुणे पोलिसांनी आज पुण्यातील काही हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Related posts

अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख

Vishal Khandagale

लॉकडाऊनच्या ०.४ मार्गदर्शक सूचना जारी

Vishal Khandagale

सिरम इन्स्टिट्यूटच्या आगीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी 

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX