पुणे

पुणे शहरातील मानाच्या गणपतींची साधेपणाने विधीवत प्राणप्रतिष्ठापणा….

Pune City News:- पुण्यातील मानाच्या गणपतींचे आज साधेपणाने प्राण प्रतिष्ठापणा साध्या पद्धतीने करण्यात आली. मंदिरला, मांडवाला रंगेबेरंगी फुलांची सजावट केली जात होती.
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या व मानाचा पहिला गणपती कसबा गणपती सार्वजनिक मंडळाची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११.४० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आली.

मानाचा दुसरा गणपती असलेल्या ग्रामदेवता तांबडी जोगेश्‍वरी गणपती मंडळासमोर कार्यकर्त्यांनी शंखनाद करत उत्साह आणला. अतिशय पवित्र अशा वातावरणात अखिल मंडई गणपती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाचे उत्सवप्रमुख पुुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आली. तर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठा केसरीवाडा गणपती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक यांच्या हस्ते करण्यात आली.

मानाचा पाचवा केसरीवाडी गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांच्या हस्ते करण्यात आली.

मानाच्या गणपतींप्रमाणेही पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना मंदिरातच करण्यात आली. मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.

अखिल मंडई गणपती मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तांबडी जोगेश्‍वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी तर श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाची प्राणप्रतिष्ठापना गुरूजी तालीम गणपती मंडळ प्रविण परदेशी यांच्या हस्ते केली.

Related posts

पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सव

Vishal Khandagale

शहरांत 13 ठिकाणी होणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, जाणून घ्या

Vishal Khandagale

घरगुती गणेशोत्सव सजावट प्रदर्शन २०२० स्पर्धेचा निकाल जाहीर…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX