Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात !

काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार अडचणीत सापडले आहे.
कमलनाथ सरकारने बहुमत गमावले आहे का याचा निर्णय विधानसभेत कधी व कसा करावा याचा वाद आता भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात नेला आहे.यावर आज बुधवारी सुनावणी होऊन काही मार्ग निघेल, का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कमलनाथ सरकारला विधानसभेत तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह 10 भाजपा आमदारांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून आज तातडीने सुनावणी घेण्याचे ठरविले.
या सुनावणीत सहभागी होण्यासाठी 17 बंडखोर काँग्रेस आमदारांनीही अर्ज केला आहे.
कोरोनामुळे अधिवेशन 27 पर्यंत तहकूब असूनही विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरुद्ध काँग्रेसने याचिका केली आहे.आज अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दिवसात काय काय घडते हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Related posts

या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

Vishal Khandagale

सीबीएसई, आयसीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment