Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 107 वर

Pune City News :- कोरोना विषाणू चा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून रुग्णांच्या आकडेवारीत मात्र दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात अजून सहा जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले असून यासोबतच करोनाग्रस्तांचा आकडा 107 वर पोहोचला आहे.

यामध्ये मुंबईचील पाच जण आहेत. तर एक रुग्ण अहमदनगरचा आहे. सोमवारी 97 वर पोहोचलेला आकडा आज संध्याकाळपर्यंत 107 वर पोहोचला आहे.

सकाळी चार जणांना लागण झाली असल्याची स्पष्ट झालं होतं. यामध्ये पुण्यातील तीन आणि साताऱ्यातील एक जण होता.

महाराष्ट्र करोनाच्या धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Related posts

लसीकरणासाठी पहिल्या तासात 35 लाख लोकांची नोंदणी

Vishal Khandagale

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

संपूर्ण तालुका क्वारंटाईन(विलींगीकरण)!

Vishal Khandagale

Leave a Comment