कोरोनाराष्ट्रीय

कोरोना : मी देशाची माफी मागतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pune City News :- कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही आपण आपलीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असंही “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी” म्हटलं आहे.करोनाशी लढाई करायची असेल तर लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. करोना विषाणु सोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. जगभरात करोना विषाणु मुळे मृतांची संख्या वाढली आहे. हा नक्कीच चिंतेचा विषय असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.
तसेच, अनेक लोक माझ्यावर नाराज असतील, मी असा का निर्णय घेतला? हे असे कसे पंतप्रधान आहेत? असंही अनेकांना वाटलं असेल. मात्र कठोर निर्णयांशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असंही मोदींनी म्हटलं आहे.
PM Twitte

Related posts

जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक इशारा!

Vishal Khandagale

कोरोना : रेशनवरील धान्याचा कोटा 2 किलोवरून 7 किलो

Vishal Khandagale

येरवडा पोलीस ठाणे व पेपल सेमनरी कडून गरजू व गरीब नागरिकांना किराणा वाटप!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX