पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान…

PUNE CITY NEWS :- जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३५ वा पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आली.

सर्व प्रथा परंपरांचे पालन केलं जात आहे. खा. श्रीरंग बारणे यांच्यासह तहसीलदार आणि मानाच्या ५० वारकऱ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करत वारकऱ्यांनी टाळ मृदुगांचा तालावर ठेका धरला आहे. तुकोबांच्या देहूत यंदा टाळ मृदुगांचा गजरही नाही, अन ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात देहूनगरी दुमदुमलीही नाही.

पण मोजके वारी विवेकाची पताका खांद्यावर घेत, वारीची परंपरा जपताना दिसत आहेत. दरवर्षी मोठा उत्साह असणाऱ्या इंद्रायणीच्या काठावर मात्र शुकशुकाट आहे.

पण वारकऱ्यांनी गजबलेला इंद्रायणीचा घाट यंदा शांत आहे. कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देहूमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देहू गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच देहूमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मंदिराचंही निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. तसेच कोण कुठे थांबेल याचे मार्किंगही केलं होतं.

Related posts

अभिनेता सुबोध भावेसह पत्नी, मुलाला कोरोनाची लागण

Vishal Khandagale

कोरोनाबाधितांच्या संपर्कात शहरातील 337 जण !

Vishal Khandagale

महानगरपालिका निवडणुकीत ५० ते ६० नगरसेवकांचे लक्ष्य : मनसे

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX